Friday, October 7, 2016

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यशाळा दे.राजा

💐 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कायर्शाळा दे.राजा* 💐
आज दि०७/१०/२०१६ रोजी व्यंकटेश महाविद्यालय दे.राजा येथे अप्रगत वर्ग असणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा आनंदी वातावरणात पार पडली.

💐 *या कार्यक्रमाला दे.राजा तालुक्याचे प्रेरणास्थान गटशिक्षणाधिकारी श्री. मुसदवाले साहेब* तसेच *व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जाधव सर प्रमुख पाहुणे होते*
*विस्ताराधिकारी श्री.चव्हाण साहेब, केंद्र प्रमुख श्री. झिने सर , श्री. कुमठे सर व श्री. सोनुने सर उपस्थित होते.*

 💐 *प्रास्ताविक श्री. झिने सर यांनी केले* व *कार्यशाळेचे सूत्र संचालन श्री. गिरी सर विषय साधन व्यक्ती पं.स.दे.राजा यांनी केले.*
💐 *प्राचार्य जाधव सरांनी मनोगत व्यक्त केले*
💐 *प्रगत गिरोली खु. शाळेच्या श्री. बुरकुल सरांनी* शाळेतील उपक्रम सर्वांसमोर मांडले व  साहित्याचा वापर करून उपक्रमांचे सादरीकरण केले तसेच गीतातून मांडलेली मापन संकल्पना प्रेरणादायी ठरली.

💐 *प्रगत कुंभारी शाळेच्या श्रीमती मंडळकर madam* यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणून त्यांच्या
 मापन,अपूर्णांक या संकल्पनांवरील उपक्रमांचे  अतिउत्तम सादरीकरण केले.

💐 *प्रगत पळसखेड मलकदेव शाळेच्या श्री.खेडेकर सरांनी* शाळेतील उपक्रमांचे PPT  व्दारे सादरीकरण केले तसेच सरांनी बनविलेल्या *व्हिडीओ व ब्लॉग चे सदरीकरण करण्यात आले.*

💐 *प्रगत रोहिदास वाडी शाळेच्या श्री. मुंढे सरांनी* त्यांच्या शाळेतील उपक्रम सर्वांन सोबत शेयर केले व शैक्षणिक साहित्य निर्मिती बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

💐 *प्रगत रोहणा शाळेच्या श्री.नागरे सरांनी* शिक्षकांकडूनच  त्यांच्या शाळेतील उपक्रमाचे कृतियुक्त सादरीकरण करून घेतले. वीट भट्टीवरील मुल प्रगत होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मार्गदर्शक ठरले.

💐 *प्रगत शाळा पांगरी येथील श्री.वाघ सर* यांनी पीपीटी व्दारे शाळेतील उपक्रम मांडले. त्यांचा संख्यांचा डोंगर हा उपक्रम सर्वांना भावला.

💐 *मुसदवाले साहेबांच्या मुलाने* व्यापार या खेळाचे सादरीकरण करून खेळाचा शैक्षणिक उपयोग शिक्षकांना दाखवून दिला.

💐 *सादरीकरण करणाऱ्या सर्व शिक्षकांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला.*

💐 *सर्वात शेवटी गटशिक्षणाधिकारी श्री. मुसदवाले साहेब यांनी वर्ग प्रगत होण्यासाठी शिक्षकांची इच्छाशक्ती कशी कारणीभूत ठरते ते गोष्टीतून शिक्षकांच्या नजरेस आणले व शिक्षकांना कार्यप्रेरणा देवून लवकरच दे.राजा तालुका प्रगत होण्यासाठी दिशा दाखवली.*

💐💐💐अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आजची कार्यशाळा पार पडली💐💐
💐 *शब्दांकन
- श्री. विनोद सोनूने केंद्रप्रमुख असोला ज*💐

Monday, October 3, 2016

अर्थपूर्ण शब्द शोध तक्ते

नमस्कार मित्रांनो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम प्रभावीपणे आपल्या वर्गात राबाविण्या साठी अनेक उपक्रमांचा आपण उपयोग करत असतो त्यापैकी एक  उपक्रम म्हणजे
तक्ता वापरून अर्थपूर्ण शब्द शोधा व लिहा
या उपक्रमाचे 10 तक्ते  मी तयार केलेले आहेत ते तुम्ही डाउनलोड करा 


अर्थपूर्ण शब्द शोध तक्ते डाउनलोड करा 

Sunday, October 2, 2016

                 



नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉग चे मोबाईल app डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला
 क्लिक करा .


शिक्षणाची वारी ब्लॉग  डाऊनलोड